.. यापुढे राज्यात लॉकडाऊन नाही - राजेश टोपे

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार

Updated: Oct 10, 2020, 11:13 AM IST
.. यापुढे राज्यात लॉकडाऊन नाही - राजेश टोपे title=

मुंबई : राज्यात सध्या अनलॉकचा ५ वा टप्पा सुरू आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाने महाराष्ट्र शिरकाव केला. यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे १२,१३४ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ३०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आता राज्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितलं आहे.  

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितल. नियम पाळणं खूप महत्वाचं त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 

तसेच आता शाळा, मंदिरं टप्प्यांमध्ये उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. जिम टप्प्याटप्यात उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. 

कोरोनाव्हायरसचा coronavirus वाढता प्रादुर्भाव अनेकांच्या चिंतेत भर टाकत आहे. देशभरात दर दिवशी हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच राज्यातही चित्र वेगळं नाही. कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या महाराष्ट्रात गुरुवारी १३,३९५ नवे कोरोनाबाधित आढळले. 

कोरोनामुळं या एका दिवसात ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, तब्बल १५,५७५ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. राज्यात एका दिवसातील कोरोना रुग्णांची ही आकडेवारी पाहता एकूण रुग्णांचा आकडा १४,९३,८८४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९,४३० मृत्यू आहेत, तर ११,९६,४४१ रुग्णांनी कोरोनारवर मात केली आहे. 

सध्याच्या घडीला राज्यात २,४१,९८६ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरु आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राज्यात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं भर पडत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट ८१.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.