आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची सुटका

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कर्नाटक पोलिसांनी सुटका केली आहे.

Updated: Jan 17, 2020, 06:44 PM IST
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची सुटका

बेळगाव : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कर्नाटक पोलिसांनी सुटका केली आहे. सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्य़क्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येवू नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांकडून वाहनांची तपासणीही सुरू होती. मात्र गनिमी काव्यानं येड्रावकर हुतात्मा चौकात पोहोचले. 

यावेळी अभिवादन करत असताना कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखलं आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर यड्रावकरांना अटकही करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी यड्रावकरांना महाराष्ट्रात आणून सोडलयं.