नंदूरबार जि.प.अध्यक्षपदी सीमा पद्माकर वळवी

नंदूरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांची निवड झाली आहे.

Updated: Jan 17, 2020, 06:44 PM IST

नंदूरबार : नंदूरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी २३ सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आज निवडणुकीवेळी शिवसेनेच्या सात सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर वळवी यांची निवड निश्चित झाली होती. 

बहुमत जमवण्यात अपयश आल्यानंतर भाजप सदस्यांनीही वळवी यांनाच मतदान केलं उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम रघुवंशी निवडून आलेत. रघुवंशी यांना ३० तर भाजपच्या उमेदवाराला २६ मतं पडली.