Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा

Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.    

श्वेता चव्हाण | Updated: Apr 3, 2024, 03:46 PM IST
Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा title=

Maharashtra Heatwave conditions in Marathi : सध्या महाराष्ट्रातील अनेक राज्यात तापमानाचा पार वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळेत तर सूर्य आग ओकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच  उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचपार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सावधतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे उष्माघातामुळे महाराष्ट्रात 23 जण बळी ठरले आहेत.

दरम्यान मुंबईत दिवसाचे तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले असून आर्द्रतेचे प्रमाण 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (2 एप्रिल 2024) मुंबईतील आर्द्रतेचे प्रमाण रात्री 76 टक्के आणि दिवसा 62 टक्के नोंदवले गेले. हवामानतज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, दिवसा जास्त तापमान असल्याने आर्द्रता नसते आणि रात्रीच्या तुलनेत हवेतील आर्द्रता कमी असते. तर रात्रीच्या वेळी आर्द्रता वाढते. तुम्हाला जास्त थकल्यासारखे वाटते, खूप गरम वाटते आणि अस्वस्थ वाटते.

तर मुंबईत कमाल तापमान 32.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.8 अंश सेल्सिअस होते. 8 एप्रिलपर्यंत मुंबईत दिवसाचे तापमान 35 अंश तर रात्रीचे तापमान 24 अंश राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आहे.  वाढत्या तापमानामुळे अनेकजण उष्माघाताचे बळी होतात. 

महिन्याभरात 23 जणांचा बळी

महाराष्ट्रात गेल्या 28 दिवसांत उष्माघाताने 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक 3, रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

उष्माघाताची लक्षणे 

चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी यांचा समावेश होतो. म्हणजे असामान्यपणे उच्च शरीराचे तापमान (104 अंशांपेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा उष्ण आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीर ताठ होते, हात-पायांमध्ये पेटके येतात, मानसिक बदल होतात, चिडचिड होते, गोंधळ होतो आणि कोमा म्हणजे बेशुद्धी येते आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो. 

काय काळजी घ्यावी?

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याची तीव्रता सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान सर्वाधिक असते, त्यामुळे तेथे चालणे, काम करणे किंवा खेळणे टाळा. जर बाहेर जाणे आवश्यक असेल सोबत अत्यावश्यक गोष्टी असणं गरजेचे आहे. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. उशिरा कमांची विभाग सकाळी किंवा संध्याकाळी करा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हलक्या रंगाचे आणि सैल कपडे वापरा. घट्ट जीन्स आणि चमकदार कपडे घालणे टाळा. टोपी, स्कार्फ बांधा आणि छत्री वापरा. तापमान वाढले की पाणी पिण्याचे प्रमाण देखील वाढवा. थकवा जाणवू न देता दररोज 8 ते 10 ग्लासांपेक्षा जास्त पाणी प्या. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी, ORS यांचे सेवन जास्तीत जास्त करा. जास्त साखर किंवा अल्कोहोल सामग्री असलेले पेय पिणे टाळा. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. तसेच बाहेरील थंड पेय पिणे टाळावे.