मुंबई : मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात घाट भागात (सातारा, पुणे) अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पूर परिस्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. आयएमडीने दिलेल्या चेतावणी नुसार 24 तासात घाट भागात (सातारा, पुणे) अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकणात व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. मराठवाडासह.
पुर परिस्थितीची शक्यता pic.twitter.com/rWIkFtXI5S— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 17, 2020
हवामान खात्याने पुणे आणि सातारा भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येते काही दिवस पाऊस कायम राहणार आहे.