दापोली तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस

दोपोलीत जोरदार पाऊस

Updated: Jun 23, 2018, 07:22 PM IST
दापोली तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस  title=

रत्नागिरी : दापोली तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे दापोली-हर्णे मार्ग बंद झाला आहे. पाणी रस्त्यावर आल्याने अनेक पर्यटक अडकले आहेत. आतापर्यंत दापोली तालुक्यात २४ तासात २१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं आहे. या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहू लागले. तिकडे सिंधुदुर्ग, देवगड आणि मालवणमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.