रायगड : रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. अलिबागसह माणगाव, महाड, मुरुड, म्हसळा, रोहा, उरण या तालुक्यात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
जिल्ह्यात गेले चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा हिरमोड झालाय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 26 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पेण तालुक्यात सर्वाधिक 100 मिमी इतका पाऊस बरसला आहे.