थंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती

 तोरणमाळमधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो 

Updated: Sep 14, 2019, 05:59 PM IST
थंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती title=

नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या तोरणमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये आणि दुर्गम भागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होता. पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ इथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. तोरणमाळमधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो झाला असून, तलावाचे आणि नाल्याचे पाणी गावात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाले आहे. 

गावात सर्वत्र पुराचे पाणी पाहण्यास मिळत आहे. या पुरामुळे पर्यटकांना मात्र अडचणींनाचा सामना करावा लागत असून, येणाऱ्या पर्यटकांना या पावसामुळे सहलीचे नियोजन रद्द करावे लागले. यामुळे पर्यटक व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे.

तोरणमाळमध्ये सध्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमळजवळ अनेक पर्यटक येतात. नंदुरबार जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.