पुण्यात धो धो पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती, महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोल

पुण्यात धो धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली झाली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 8, 2024, 07:28 PM IST
पुण्यात धो धो पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती,  महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोल title=

Pune Rain : पुण्यात धो धो पाऊस पडत आहे. या पवासामुळे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोल झाली आहे.अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत. या पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मागील दोन ते तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस पडत आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  पाणी साचला आहे. पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच स्पष्ट झालं आहे. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची लक्तर या पावसानं काढली आहेत.  

पुणेकरांचे अतोनात हाल  

पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलीये. अनेक ठिकाणी गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. तर काही भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

पावसामुळे पुण्यात  जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते पाहून खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहान केले आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असेही मोहोळ यांनी ट्विटमध्ये पोस्टमध्ये म्हंटले आहे.

अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू 

नंदुरबारमधील मुंदलवळ गावात अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू झालाय... पाऊस सुरू असल्याने झाडाखाली थांबलेल्या 2 युवकांवर वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर दुस-याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x