तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर नकली कि असली?

नकली सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या एजन्सीवर पुणे अन्न औषध प्रशासनानं छापा टाकत कारवाई केली आहे.

Updated: Jul 28, 2021, 08:22 PM IST
तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर नकली कि असली? title=

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका कायम असताना, बोगस सॅनिटायझरची विक्री वाढलीय. त्यामुळे कोरोनाशी लढा देत असताना सामान्यांच्या डोक्याचा ताप आणखीनंच वाढला आहे, बनावट सॅनिटायझरची विक्री करणा-या एजन्सीवर पुणे एफडीएनं छापा घातला आहे.हे बोगस सॅनिटायझर ओळखायचं कसं? हे झी 24 तासच्या या रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

नकली सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या एजन्सीवर पुणे अन्न औषध प्रशासनानं छापा टाकत कारवाई केली आहे. बनावट सॅनिटायझर, बॉटल्स, स्टिकर असा एकूण 17 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. चंदननगर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. नकली सॅनिटायझर बनवणा-यांची टोळीच कार्यरत असावी, असा एफडीए आणि पोलिसांना संशय आहे...

तुम्ही खरेदी करत असलेलं सॅनिटायझर असली की नकली, हे कसं ओळखायचं हा मोठा प्रश्नच आहे. पण त्यासाठी अगदी घरच्या घरी ओळखता येतील, अशा सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

 

 

 

 

 

अशा नकील सॅनिटायझर निर्मितीचा पर्दाफाश करण्यासाठी काळजी घेणं गरजेच आहे.

खरेदीआधी बाटलीवरील स्पेलिंग, उत्पादनाची तारीख, एक्स्पायरी डेट, अल्कोहोलचं प्रमाण आदी तपशील काळजीपूर्वक पाहा. अधिकृत मेडिकल शॉपमधूनच सॅनिटायझर खरेदी करा...