पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणचा निकाल ९४ टक्के लागला आहे. राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८९.५० टक्के इतका होता तर यंदा हा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे.
एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची टक्केवारी ८५.२३ टक्के असून मुलींची सर्वाधिक टक्केवारी ९२.३६ टक्के आहे. तर अपंग विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.७८ आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. तर दुपारी १ वाजता अधिकृतपणे संपूर्ण निकाल पाहता येणार आहे.
अधिक वाचा - डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!
कोकण - ९४.८५
पुणे - ८९.५८
नागपूर - ८७.५७
औरंगाबाद - ८८.७४
मुंबई - ८७.४४
कोल्हापूर - ९१.००
अमरावती - ८८.०८
नाशिक - ८६.१३
लातूर - ८८.३१
विज्ञान - ९५.८५
कला - ७८.९३
वाणिज्य - ८९.५०
व्यवसाय अभ्यासक्रम - ८८.४१
दुपारी १ वाजता अधिकृतपणे संपूर्ण निकाल पाहता येणार आहे.
http://mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.
- www.mahresult.nic.in
- www.result.mkcl.org
- www.maharashtraeducation.com