समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी, पहिला टप्पा 2 मेपासून सुरु

Mumbai-Nagpur expressway first phase to open : समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी. नागपूर - शेलू बाजार दरम्यानची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Updated: Apr 25, 2022, 07:53 AM IST
समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी, पहिला टप्पा 2 मेपासून सुरु title=

नागपूर : Mumbai-Nagpur expressway first phase to open : समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी. नागपूर - शेलू बाजार दरम्यानची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 2 मे रोजी उद्घाटन होणार आहे. (First phase of Nagpur-Mumbai expressway to open on May 2) नागपूर-शेलूबाजारदीड तासात  गाठता येणार आहे. प्रवास सुपरफास्ट होणार असला तरी या समृद्धी महामार्गाच्या 210 किमीसाठी 365 रुपये टोल भरावा लागणार आहे. 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार दरम्यानचा 210 किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे, तर शेलू बाजार ते शिर्डी हा 310 किलोमीटरचा रस्ता 15 ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने अधिकृतपणे 701 किमी लांबीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील या भागाचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. एकदा पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे कार्यान्वित केलेला मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग, दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 14-15 तासांवरून जवळपास आठ तासांपर्यंत कमी होणार आहे.

नागपूर - शेलू बाजार टप्प्यात 8 टोल नाके असणार आहेहत. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर हलक्या वाहनांना 365 रुपये टोल मोजावा लागणार आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर-शेलू बाजार 210 किमीच्या टप्प्यातील वाहतूक सुरु होणार असली तरी द्यावा लागणारा टोल पाहता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  समृद्धी महामार्ग 2021पर्यंत हा महामार्ग खुला होणे अपेक्षित होते. कोरोना काळात या मार्गाचे काम खोळंबले होते. तसेच पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे सध्या फक्त पहिला टप्पा खुला होत आहे. हा मार्ग 2023 पर्यंत वाहतुकीला खुला होईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प आणि कारंजा सोहळ आणि काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या अभयारण्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमधून 210 किमीचा विभाग वन्यजीव कॉरिडॉर आहे. वाघ आणि पाळीव प्राण्यांचा वावर अपेक्षित आहे. त्यामुळे या मार्गावर डिझाइन केलेले अंडरपास खूप महत्वाचे आहेत. या ई-वेवर एकूण 76 अंडरपास आहेत. वन्यजीवांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अंडरपास आणि ओव्हरपास तयार झाल्यानंतरच एक्स्प्रेस वे खुला व्हावा, प्राणी प्रेमी आणि निसर्ग प्रेमींची मागणी आहे.