जे शिवसेनेत घडलं तसचं सेम आता राष्ट्रवादीत घडणार; महाराष्ट्राच्या राजकारणात झिरवळ मोठा धमाका करणार?

Maharashtra Politics : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात झिरवळ पितापुत्रांमध्ये सामना होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण नरहरी झिरवाळ यांना त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ विधानसभेला आव्हान देण्याच्या तयारीत आहे

वनिता कांबळे | Updated: Jul 29, 2024, 07:26 PM IST
जे शिवसेनेत घडलं तसचं सेम आता राष्ट्रवादीत घडणार; महाराष्ट्राच्या राजकारणात झिरवळ मोठा धमाका करणार? title=

Narhari Zirwal, Gokul Zirwal : महाराष्ट्रात नुकीतच पार पडलेली लोकसभा निवडणुक लक्षवेधी ठरली ती कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादामुळे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर  गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर, मुलगा अमोल किर्तीकर हे ठाकरे गटातच राहिले. बाप बेटे दोघेही निवडणुकीच्या रिंरणात उतरले होते. अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादीत पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मुलगा गोकुळ नरहरी झिरवाळांना आव्हान देणार आहे. यामुळे दिंडोरी मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा असा सामना रंगणार आहे. 

झिरवळ पिता-पुत्रांमध्येच सामना रंगण्याची शक्यता

नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात झिरवाळ पिता-पुत्रांमध्येच सामना रंगण्याची शक्यता निर्माण झालीय.. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केली. विशेष म्हणजे महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आली..

एकीकडे अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.. काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलीय.. वेळ पडली तर वडिलांविरोधातही उभं राहण्याची तयारी गोकुळ झिरवाळांनी केलीय..  दरम्यान, गोकुळ झिरवाळांना नरहरी झिरवळांनी वडीलकीचा सल्ला दिलाय... राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिलाय. 

महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरूद्ध पुतण्या, भाऊ विरुद्ध भाऊ, नणंद विरुद्ध भावजय, भाऊ विरुद्ध बहिण अशा एक ना अनेक लढती आतापर्यंत आपण पाहिलेत.. जर खरंच गोकुळ झिरवाळ दिंडोरीच्या रिंगणात उतरले तर आगामी विधानसभेत आपल्याला बाप विरुद्ध बेटा असा सामनाही पाहायला मिळू शकतो..