60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये

Parbhani Suicide News: परभणी येथे एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 60 हजार रुपयांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. 

Updated: Jul 18, 2023, 06:59 PM IST
60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये title=

Parbhani Suicide News : सध्या हुंडा घेण्याची आणि देण्याच्या प्रथेवर कायद्याने बंदी आहे. मात्र, अप्रत्यक्षरित्या अनेक विवाहित महिलांचा पैशांसाठी छळ होत आहे. परभणी येथे एका विवाहीतेने 60 हजारासाठी जीव दिला आहे. सासरची मंडळी तिच्यावर माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव आणत छळ करत होते. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेून आत्महत्या केली आहे. या प्ररकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील पोहडुळ तांडा येथे हा प्रकार घडला आहे.  शेख नेहा शेख खालेद असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तिच्या सासरचे मंडळी तिच्याकडे कारचा हप्ता भरण्यासाठी तुझ्या माहेरकडून 60 हजार रुपये आन म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. विवाहितेल आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे वडील शेख जफर शेख सादिक यांनी सासरच्या सहा जणांविरोधात सोनपेठ पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

महिलांच्या छेडछाडी विरोधात बैठक

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरात माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि ग्रामस्थांनी प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. मागील काही दिवसांपासून शाळा, कॉलेज, खासगी क्लासेससाठी येणार्‍या मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर कर्डीले यांनी स्थानिक नागरिकांसह पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. 2 जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शालेय विद्यार्थीनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा थेट शाळेत येऊन एका युवकाने मुलींची छेड काढल्याचा प्रकार घडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावीत अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा कर्डीले यांनी दिला आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x