क्रिकेटचे वेड जीवावर बेतलं; क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करत असताना तरुणाचा धक्कादायक मृत्यू

क्रिकेटच्या मैदानातच तरुणाचा LIVE मृत्यू; दोन बॉलमध्ये दोन सिक्स, तिसऱ्या बॉलला आयुष्याची मॅच हरला 

वनिता कांबळे | Updated: Jan 28, 2025, 05:09 PM IST
  क्रिकेटचे वेड जीवावर बेतलं; क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करत असताना तरुणाचा धक्कादायक मृत्यू title=

Virar News : क्रिकेटच्या मैदानातच तरुणाचा LIVE मृत्यू झाला आहे. या तरुणाने  दोन बॉलमध्ये दोन सिक्स मारले. मात्र,  तिसऱ्या बॉलला तो आयुष्याची मॅच हरला. विरारमध्ये ही घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे.  
सागर वझे असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर 27 वर्षांचा होता.  तो विरार च्या कोपर गावात राहणारा आहे. चांगला खेळाडू म्हणून त्याची सर्वत्र ओळख होती. तो एक चांगला बॅट्समन होता असे त्याचे मित्रपरिवार सांगतात. 

विरारमध्येच आयोजीत करण्याक आलेल्या एका क्रिकेट सोमन्यात सागर सहभागी झाला होता. सागर मोठ्या जल्लोषात बॅटिंगसाठी मैदानात उतरला. सागरने  पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकून दमदार खेळी केली. मात्र, तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकण्यासाठी तो पुढे आणि अघटित काही तरी घडलं. फलंदाजी करत असताना हृदयविकाराचा झटका येऊन सागरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू झाला. 

सागरला या अगोदर देखील हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टरांनी त्याला  क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती. मात्र, क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला.  सागरची बॅटिंग येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, तो जागीच मैदानावर कोसळला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. शुक्रवारचा सूर्यास्त त्यासाठी अखेचा ठरला. तरुण वयातील त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांचा सल्ला ऐकला असता तर आज सागरचा जीव वाचला असता. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x