मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्र आणि मुंबईत इन्कम आहे असे वाटतंय. जिथे भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात इन्कम नाही आणि टॅक्सही नाही. त्यामुळे त्या राज्यांत सर्व काही अलबेल चाललंय. महाराष्ट्राच्या जनतेला कोण कशा प्रकारे त्रास देत आहार याची नोंद जनता घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते संजय राऊत यांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर हल्लबोल केलाय.
केंद्रीय तपास यंत्रणांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये काम होते. आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे त्याचे काम महाराष्ट्रातच चालू आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे, असे ते म्हणाले.
भाजप जे काही करतंय त्याची नोंद आम्ही ठेवत आहोत. महाराष्ट्राची जनताही पहात आहे. काय शोध घ्यायचा असेल तो घ्या. जे शोधायचं आहे ते शिधा. ढुंढते रह जाओगे. मात्र, परत सांगतो, महाराष्ट्र वाकणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.