इन्कम टॅक्सची धाड : लवकरच दूध का दूध, पानी का पानी - अजित पवार

 Income Tax Raid News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांवर, साखर कारखान्यांवर आणि चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आज दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरुच आहे.  

Updated: Oct 8, 2021, 10:13 AM IST
इन्कम टॅक्सची धाड : लवकरच दूध का दूध, पानी का पानी - अजित पवार
संग्रहित छाया

पुणे : Income Tax Raid News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांवर, साखर कारखान्यांवर आणि चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आज दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरुच आहे. (Income Tax Raid) याबाबत अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच दूध का दूध, पानी का पानी, करु असे अजित पवार म्हणाले. (Income tax raid: Ajit Pawar's reaction, I will present my role soon)

पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकारी छापे टाकले. पाहुणे घरी आहेत, ते गेल्यावर माझी भूमिका मांडेन. नियमाने जे असेल ते समोर येईल. घाबरायचं कारण काय? आयटी छाप्यांनंतर, अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लवकरच दूध का दूध पानी का पानी आपण करणार आहोत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नरिमन पॉईंट कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी केली. ही छापेमारी सुरुच आहे. 24 तास उलटले तरी पार्थ पवारांच्या कार्यालयात अधिकारी झडती घेत आहेत. नरिमन पॉईंट येथील निर्मल भवन या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर काल आयकर विभागाने धाड टाकली. यातच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे आज सुद्धा या कार्यालयावर छापेमारी सुरूच आहे. कागदपत्रे, मुख्य दस्तऐवज ताब्यात घेण्यात आलेत. 

दरम्यान, आयकर विभागाने पुणे आणि सातारा येथे 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागाने छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापा मारला. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर , नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापा मारला. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाने छापे टाकले.