तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुड किनारी कोसळले

भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी कोसळले. या अपघातात ४ जण जखमी झालेत. यात महिला पायलट गंभीर आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2018, 05:40 PM IST
तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुड किनारी कोसळले title=
छायाचित्र : आयएएनएस

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी कोसळले. या अपघातात ४ जण जखमी झालेत. यात महिला पायलट गंभीर आहे.

लॅंडिंग करताना कोसळले

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गस्तीवर असताना हा अपघात झाला. मुरुडजवळच्या नांदगाव येथे लॅंडिंग करताना समुद्र किनारी कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ४ जण प्रवास करीत होते. यात एक महिला पायलट गंभीर असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या महिला कर्मचाऱ्याला नौदलाच्या हेलिकॉप्टरने उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.  

नौदलाचे एक पथकही मदतीसाठी

दरम्यान, मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची माहिती घेत आहेत. त्याचबरोबर नौदलाचे एक पथकही मदतीसाठी नांदगावला दाखल झाले आहे. हा अपघात कसा झाला, याची माहिती देण्यात आलेली नाही.