'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'

जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.

Updated: Feb 3, 2020, 07:42 PM IST
'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर' title=

चंद्रपूर: सध्या देशाचे अर्थतंत्र ऑक्सिजनवर असल्याची टीका आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते सोमवारी चंद्रपुरातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आर्थिक सुधारणांच्या पातळीवर मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशातील लघू-मध्यम उद्योग बंद पडले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला गेला. संपूर्ण देशाचं अर्थतंत्रच ऑक्सिजनवर आहे, असे तोगडिया यांनी म्हटले. तसेच जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही. या देशातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवडले आहे, असा टोलाही तोगडिया यांनी लगावला. 

अर्थसंकल्पाचे वाचन करताना सीतारामन यांची तब्येत बिघडली

राम मंदिर आंदोलन आणि नव्वदीच्या दशकात हिंदुत्‍वाचा आवाज असलेले प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांच्यात एकेकाळी चांगले सख्य होते. तब्बल ३० वर्षे त्यांनी विश्व हिंदू परिषदेत काम केले. या काळात नरेंद्र मोदी आणि तोगडिया यांनी एकत्रितपणे हिंदुत्वाचा प्रचार केला होता. १९७२ पासून मोदी आणि त्यांच्यात मैत्री होती. 

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी

एकेकाळी दोघे नेते एकाच स्कूटरवर फिरत असत. १९८३ मध्ये तोगडिया यांना विहिंपमध्ये तर मोदी यांना भाजपमध्ये पाठवण्यात आले. २००१ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. यावेळी दोघांचे संबंध चांगले होते. पण नंतरच्या काळात त्यांच्यात वितुष्ट आले. यानंतर तोगडिया यांनी नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांवर जाहीरपणे टीका केली. यामुळेच तोगडिया यांची विहिंपमधून गच्छंती झाल्याचे बोलले जाते. 

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर