नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पने (IOC) एक नवी योजना आपल्या ग्राहकांसाठी खास आणली आहे. यापुढे इंडियन ऑईल पुण्यात ऑईलची घरपोच सुविधा (होम डिलिव्हरी) देणार आहे. अर्थात, ही योजना प्रायोगिक तत्वावरती आमलात आणली जाणार आहे. यात यश मिळताच हीच सेवा देशातील इतर अन्य शहरे आणि विभांगांमध्येही सुरू करणार आहे. कंपनीचे चेअरमन संजीव सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली.
कंपनीने ही योजना अधिक प्रभावी राबवता यावी यासाठी डीझेल भरणारी एक मशीन ट्रकला जोडली आहे. ही मशीन अगदी पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी असते तशीच असते. ट्रकला एक टाकीही जोडण्यात आली आहे. या ट्रकच्या माध्यमातून शहरात मागणीनुसार डीजलची होम डिलीव्हरी करण्यात येणार आहे.
दरम्यान, संजीव सिंह यांनी बुधवारी सांगितले की, 'पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेने (पेसो) या उपक्रमाला मान्यता दिल्यानंतरच अशा पद्धतीची सेवा सुरू करण्यात आली आहे. अशा पद्धतीची सेवा देणारी आमची पहिलिच कंपनी असल्याचा दावाही संजीव सिंह यांनी केला आहे. तीन महिने परिक्षण केल्यावरच ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. आता तीन महिने हा उपक्रमक कसा चालतोय याचा अभ्यास करून ही सेवा देशातील इतर शहरांमध्येही राबविण्याबाबत विचार केला जाईल.'
दरम्याना, प्राप्त माहितीनुसार ऑइल वितरण करणाऱ्या इतर कंपन्याही हा उपक्रम राबविणार आहेत. मात्र, या कंपन्यांना विवीध विभाग ठरवून देण्यात आले आहेत.