संपूर्ण वादावर हभप इंदुरीकर महाराज यांचं नव 'अस्त्र'

हभप इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर वादळ आलं आहे. इंदुरीकर यांच्या नावामुळे आपलीही

Updated: Feb 17, 2020, 04:54 PM IST
संपूर्ण वादावर हभप इंदुरीकर महाराज यांचं नव 'अस्त्र'

अहमदनगर : हभप इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर वादळ आलं आहे. इंदुरीकर यांच्या नावामुळे आपलीही प्रसिद्धी होईल, यामुळे इंदुरीकरांवर टीका करणारे पुढे येत असल्याचा आरोपही इंदुरीकर समर्थकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर समर्थकांनी चलो नगरचा नारा दिला होता. यावर इंदुरीकरांनी आपल्या समर्थकांनी लेखी आवाहन केलं आहे. चलो नगर म्हणत मोर्चा काढू नका, गर्दी जमवू नका, कायदा व सुव्यवस्था राखा, असं आवाहन इंदुरीकरांनी समर्थकांना केलं आहे.

दरम्यान, इंदुरीकरांनी सम-विषम वादावर अस्त्र काढलं आहे. इंदुरीकरांनी वादावर भूमिका घेताना म्हटलं आहे. आता याविषयी काहीही बोलणार नाही. एकंदरीत इंदुरीकरांनी आता मौन अस्त्र संपूर्ण वादावर वापरलं आहे.

यामुळे इंदुरीकरांनी कोणतंही भाष्य वादावर न केल्याने, इंदुरीकर विरोधकांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. इंदुरीकरांनी आपल्या ठरलेल्या तारखांप्रमाणे कीर्तन करण्याचा धडाका चालूच ठेवला आहे.

इंदुरीकर सर्व विषयांवर बोलणार आहेत, पण समविषम वादावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे इंदुरीकरांचं 'मौन अस्त्र' विरोध करणाऱ्यांना घायाळ करणार असल्याचं दिसून येत आहे.