निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : हिंदू-मुस्लिम समाजाचे परस्पराबद्दलचे गैरसमज दूर व्हावे, यासाठी मालेगावच्या जमाते इस्लामी संघटनेने मशीद परिचय उपक्रमाचं आयोजन केलं होतं. हिंदू बांधवाना मशिदीत बोलवून मशिदीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. त्याला हिंदू बांधवांनीही प्रतिसाद दिला.
धार्मिक गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने मालेगावच्या जमाते इस्लामी संघटनेने पुढाकार घेत हिंदू बांधवांना मशीदपरिचय भेटीसाठी आमंत्रण दिले.
हिंदू बांधवांना ते आदराने स्वीकारतात, रजापुरा भागातील महेबूब मशिदीला भेट दिली मुस्लिम धर्मगुरूंनी मशिदीमध्ये नेमके काय चालते . नमाज कशी अदा केली जाते . इमाम कुठे उभे राहातात याची माहिती दिली. तसेच मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराण ग्रंथाबद्दलही माहिती दिली. तसेच मंदिर परिचय भेटीची अपेक्षा व्यक्त केली.
हिंदू बांधवांनी मशिदीमध्ये चालणाऱ्या कामाची माहिती जाणून घेतली, कुतूहलाने इस्लामबाबत असलेले प्रश्न विचारून घेत मुस्लिम धर्मगुरुंकडून त्याचे निरसन करून घेतले. इस्लाम धर्माची शिकवण जाणून घेतल्याने भारावून गेले . मशिद भेटीमुळे अनेक गैरसमज दूर झाले.
जे हिंदू बांधव या भेटीत सहभागी झाले होते. ते इस्लामबात असलेला समाजातील गैरसमज दूर करतील.हिंदू - मुस्लिमांमध्ये सलोख्याचे नाते निर्माण होण्यास मदत होईल अशी अशा व्यक्त केली.
हिंदू- मुस्लिमांचं मशीदीत स्नेहभोजन
भेटीनंतर हिंदू- मुस्लिम बांधावानी मशिदीमध्येच स्नेहभोजन घेतले . मशिद भेटीच्या या उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता टिकून देशात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल . प्रत्येक धर्माने आपल्या प्रार्थना स्थळावर इतर समाजाला आमंत्रित केल्यास राष्ट्रीय एकात्मते अखंडतेला तिळमात्र धक्का लागणार नाही सर्व समाज बांधव गुण्या - गोविदाने देशात नांदतील यात शंका नाही .