पुणे : Decrease in temperature in Maharashtra : राज्यात थंडीचा कडाका पडला आहे. अनेक ठिकाणी तापमान 3 ते 8 अंशापर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहेत. नंदुरबार आणि दापोलीत 3 अंशापर्यंत पारा घसरला होता. पुणे येथे 8 अंशांपर्यंत तापमान खाली आले. अनेक ठिकाणी 11 ते 14 पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडी कायम असून पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका राहणार कायम राहणार आहे. (Cold : Two to three day temperature drop in Maharashtra)
तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहील. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीने भरली हुडहुडी भरली आहे. तीन दिवसांनी मात्र किमान तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. गुजरात,मध्य प्रदेशात थंड दिवसाची स्थिती असल्याने मुंबई, कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीत वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा मोसम कायम राहणार आहे.