रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेची खाटेवरुन फरपट

 रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहीका जात नाही.

Updated: Sep 26, 2020, 07:13 PM IST
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेची खाटेवरुन फरपट title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : एका गर्भवती महिलेला रस्ता खराब असल्यानं गावापासून एक किलोमीटर दूर थेट खाटेवर बसून अँबुलन्स पर्यंत न्यावं लागलंय.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खडकी गावात ही घटना घडलीय.

खडकी-हसनाबाद रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहीका जात नाही. त्यामुळे आजारी माणसांची नेहमी हालत होत असते. दरम्यान या प्रसंगात गावकरी आणि गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी थेट खाटेचा वापर केला. 

गावापासून एक किलोमीटर अंतर दूर पोहचल्यानंतर या महिलेस रुग्णवाहीकेमध्ये बसून दवाखान्यात नेण्यात आलं. वारंवार या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करूनही रस्त्याचं काम होत नसल्यानं अशी जीवघेणी पीडा गावातील ग्रामस्थांना करावी लागत आहे.

त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या गावातील गावकऱ्यांनी केलीय.