भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा जोरदार विरोध

पालिकेची पहिलीच सभा प्रचंड वादळी ठरली. 

Updated: Oct 11, 2018, 11:07 PM IST
भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा जोरदार विरोध

जळगाव : निवडणुकीनंतर जळगाव महापालिकेची पहिली  महासभा पार पडली. ही सभा वादळी झाली. गाळ्यांच्या लिलावाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव, भाजपानं बहुमताने मंजूर केला. मात्र, शिवसेनेने जोरदार विरोध केला.

सभा वादळी

भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या  महापौर पत्नी सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच सभा असल्यानं, आमदार भोळे हे देखील सभागृहात येऊन बसले होते. मात्र ही पहिलीच सभा प्रचंड वादळी ठरली. 

 गाळा लिलावाला जोरदार आक्षेप

महापालिकेच्या १८ संकुलातील २ हजार ३८७ गाळ्यांच्या लिलावाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव, भाजपानं बहुमताने मंजूर केला. शिवसेना नगरसेवकांनी भाजपाच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला. भाजपा वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला.