दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचं रॅगिंग, राज्यातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सहा विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रँगिंग झालेल्यांमध्ये दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राजीव कासले | Updated: Sep 27, 2024, 04:00 PM IST
दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचं रॅगिंग, राज्यातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार title=

वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (Jalgaon Government Medical College) सहा विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रँगिंग (Ragging) झालेल्यांमध्ये दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचा समावेश आहे. रँगिक झालेले सहाही विद्यार्थी हे स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील आहेत. व्दितीय वर्षातील तीन विद्यार्थिनींनी या सहा जणांचं रॅगिंग केल्याचं राष्ट्रीय हेल्पलाइनला ई- मेलव्दारे कळविण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची चौकशी केली.

विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरला रॅगिंग केल्याबाबतची तक्रार दिल्ली इथल्या राष्ट्रीय हेल्पलाइनला ईमेलव्दारे प्राप्त झाली होती. रॅगिंग बाबत चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. . याप्रकरणाचा समितीकडून अहवाल आल्यानंतरच रॅगिंग झाली की नाही याबाबत स्पष्ट होणार असल्याचं डॉ. ठाकरे यांनी सांगितले.