जालन्यात मारहाण झालेल्या जोडप्याचं अखेर 'शुभमंगल'

जालन्यामध्ये गेल्या आठवड्यात ज्या प्रेमी जोडप्याला मारहाण झाली, त्यांचं लग्न झालं आहे. 

Updated: Feb 4, 2020, 10:36 PM IST
जालन्यात मारहाण झालेल्या जोडप्याचं अखेर 'शुभमंगल' title=

बुलडाणा : जालन्यामध्ये गेल्या आठवड्यात ज्या प्रेमी जोडप्याला मारहाण झाली, त्यांचं लग्न झालं आहे. हे दोघेही बुलडाण्याचे राहणारे होते. जालन्य़ाजवळच्या गोंदेगाव शिवारात गेल्या आठवड्यात या दोघांना गुंडांनी मारहाण केली होती. त्यानंतर याप्रकरणी ९ गुंडांना अटक करण्यात आली होती. 

आज या प्रेमी जोडप्याचं लग्न झालं. दोन्ही पक्षाकडच्या मंडळींच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न झालं.

चार आरोपींना एक दिवसाची वाढीव पोलीस कस्टडी

जालनातल्या प्रेमी जोडप्याला मारहाण आणि अत्याचार प्रकरणातल्या चार आरोपींना एक दिवसाची वाढीव पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याआधी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 

मात्र काही चौकशी बाकी असल्याकारणाने आज पोलीस कस्टडीच्या तिसऱ्या दिवशी दिवाणी न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवल्याचा निर्णय दिला.

आताच्या टॉप हेडलाईन्स

अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत 'यशस्वी', फायनलमध्ये धडक

 

दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी

 

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका

 

'साहेब अजूनही तरूण आहेत, एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान होईल'

 

'कोरोना'शी झुंजणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचा 'गुडबाय' व्हिडिओ व्हायरल

 

'कॅगच्या अहवालामुळे भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटला'