पती-पत्नीतील भांडणात मुलांचा भयंकर शेवट, जालन्यात बापानेच 3 मुलांना दिली क्रुर शिक्षा

Jalna News Today: जालन्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पतीने 3 मुलांची हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 15, 2024, 10:54 AM IST
पती-पत्नीतील भांडणात मुलांचा भयंकर शेवट, जालन्यात बापानेच 3 मुलांना दिली क्रुर शिक्षा title=
jalna news father killed his 3 childrean over marital dispute

Jalna Crime News: बाप-मुलांचे नाते हे खूप स्पेशल असते. मात्र, या नात्याला काळिमा फासणारी घटना जालना येथे घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या तीन मुलांना विहरीत फेकून देऊन त्यांची हत्या केली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबत वाद होते. त्यामुळं रोजच्या भांडणांना वैतागून पतीने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. मयत मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिन्ही मुलांची जन्मदात्या बापानेच बहत्या केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आई-वडिलांच्या भांडणांची शिक्षा तीन निष्पाप चिमुकल्यांना मिळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

12 वर्षीय सोहम ताकवाले, 5 वर्षीय शिवानी ताकवाले आणि 6 वर्षीय शिवानी ताकवाले अशी मयत मुलांची नावे आहेत. तर, संतोष ताकवाले असं आरोपीचे नाव असून तो गुंडप्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर येतेय. पोलिससूत्रांनुसार, आरोपी संतोष ताकवाले हा मूळचा संभाजीनगर जिल्ह्यातील काद्राबाद गावचा रहिवाशी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष ताकवाले याला अटक केली आहे. तर, पोलिसही अधिक तपास करत आहेत.  

पती-पत्नीच्या भांडणातून आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. डोमेगाव हे आरोपीच्या मामाचं गाव आहे. दोन दिवसांपूर्वीच तो मुलांना घेऊन येथे आला होता. त्यानंतर इथे आल्यानंतर त्याने तिन मुलांची हत्या करुन शेतातील विहरीत मुलांचे मृतदेह टाकले. रविवारी तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगत आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष हा एका हॉटेलमध्ये कामाला होता. तिन्ही मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री 8 वाजता अंबड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालयात अनेकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपी संतोषला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.