Janmashtami Holiday: जन्माष्टमीला शाळा, स्टॉक मार्केट सुरु राहणार की बंद? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Janmashtami 2024 Holiday: 26 ऑगस्टला जन्माष्टमी तर 27 ऑगस्टला दहीहंडी साजरी केली जाईल.

Pravin Dabholkar | Updated: Aug 25, 2024, 11:57 AM IST
Janmashtami Holiday: जन्माष्टमीला शाळा, स्टॉक मार्केट सुरु राहणार की बंद? जाणून घ्या महत्वाची अपडेट title=
जन्माष्टमी सुट्टी

Janmashtami 2024 Holiday: 26 ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील हा महत्वाचा सण असून भगवान श्रीकृष्णाच्या उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात विशेषत: मथुरेत जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. अशावेळी भारतातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार की बंद? स्टॉक मार्केट सुरु राहणार की बंद? अशा शंका अनेकांना पडल्या आहेत. 26 ऑगस्टला जन्माष्टमी तर 27 ऑगस्टला दहीहंडी साजरी केली जाईल.

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवस जन्माष्टमीची विशेष तयारी केली जाते. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जरी या दिवशी काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी देखील असते. यावर्षी जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 26 आणि 27 ऑगस्ट या दोन्ही दिवशी येत आहे. कुठे 26 तर कुठे 27 तारखेला जन्माष्टमी साजरी केली जात आहे. त्यामुळे तुमच्या शाळेत जन्माष्टमीची सुट्टी कधी आहे याबद्दल शाळेच्या शिक्षकांकडून खात्री करुन घ्या. विद्यार्थ्यांच्या शालेय डायरीमध्ये याची माहिती दिलेली असते. दरम्यान उत्तर प्रदेशातील शाळा 26 ऑगस्टलाच बंद राहतील.

जन्माष्टमीला सुट्टी कुठे असेल?

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भुनेश्वर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला,श्रीनगर आदी ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल. त्यामुळे येथील शाळा बंद राहतील.

जन्माष्टमीला कुठे नसेल सुट्टी?

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी सुट्टी नसेल. यामध्ये आगरतळा, बेलापूर, बेळगाव, बेंगळुरू, गुवाहाटी, भोपाळ, इंफाळ, इटानगर, कोची, कोहिमा, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, तिरुअनंतपुरम, पणजी या ठिकाणांचा समावेश आहे. काही ठिकाणी शाळा व्यवस्थापन सुट्टी देण्याबाबतचा निर्णयही घेऊ शकते. तेथे शाळा सुरू राहतील. यापैकी काही शहरांमध्ये जन्माष्टमीलाही शाळा बंद राहतात. 

बॅंका सुरु राहणार की बंद?

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी अनेक राज्यातील बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. याआधी शनिवार आणि रविवारीही बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. 

स्टॉक मार्केट सुरु की बंद?

जन्माष्टमी रोजी शेअर मार्केट बंद राहणार की सुरु? याबद्दल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना माहिती हवी असते. सोमवारी शेअर बाजार बंद राहणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सोमवारी शेअर बाजार खुला राहणार आहे. यावेळी बाजारात सुट्टी नसेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्े (BSE) नेहमीप्रमाणे काम सुरु असेल. तुम्ही पूर्वीप्रमाणे शेअर्स खरेदी आणि विक्री करु शकता. 

कधी असेल स्टॉक मार्केटला सुट्टी?

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त, 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त, 15 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीला आणि 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त स्टॉक मार्केट बंद असेल.