मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 987 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. दुसरीकडे केडीएमसीत आज 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 6 हजार 671 वर पोहोचली आहे. तर आज 241 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत कुठे किती रुग्णवाढ?
परिसर | कोरोनाचे नवे रुग्ण |
कल्याण पूर्व | 154 |
कल्याण पश्चिम | 330 |
डोंबिवली पूर्व | 316 |
डोंबिवली पश्चिम | 110 |
मांडा टिटवाळा | 57 |
मोहने | 17 |
पिसवली | 02 |