जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला

नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ

Updated: Jul 7, 2019, 08:04 PM IST
जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला title=

नाशिक : नाशिकमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. भोई गल्लीतील कांबळी वाड्याची एक बाजू दुपारी कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

गेल्या १० तासांमध्ये नाशिकमध्ये जवळपास १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने जुन्या नाशिकमधील धोकादायक असलेल्या कांबळी वाड्याची एक बाजू कोसळली. या वाड्याला महापालिकेने नोटीसही बजावली होती. 

आज दुपारी वाड्याची एक बाजू कोसळल्यानंतर अग्निशमन दलाकडून सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र एक बाजू कोसळल्यानंतर आता संपूर्ण वाडा रिकामा करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहेत. 

नाशकात पावसाचा जोर अधिकच वाढला. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.