पुणे : कर्नाटक सरकारच्या बसेस पुण्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. बेळगाव येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले नाही तर त्यांना धक्काबुक्की केली. त्यांना अटक केली. त्यानंतर बेळगाव येथे तणाव निर्माण झाला. राज्याच्या मंत्र्यांना अशी वागणून कर्नाटक पोलीस देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या वादचे पडसाद पुण्यात उमटले आहेत. पुण्यात पार्किंग केलेल्या कर्नाटक बसेस पुण्यातून बाहेर काढण्यात आल्या आहेत.
कर्नाटकमध्ये होत असलेल्या मराठी भाषिक वादामुळे पुण्यातील मराठी व्यवसायकांनी कर्नाटक गाड्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटक सरकारने ज्या प्रकारे वागणूक दिली. त्यामुळे पुण्यातील मराठी भाषिक, व्यवसायिक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पार्किंग केलेल्या बसेस यांना कर्नाटकचा रस्ता दाखण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्का बुक्की करून पुन्हा महाराष्ट्रात आणून सोडले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज 'सामना'चे संपादक खासदार संजय राऊत हे बेळगावमध्ये जाणार आहेत. मात्र, त्यांना काही अटींवर परवानगी दिली आहे. दरम्यान, माझा कार्यक्रम हा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाला जाणार, असा पवित्रा राऊत यांनी घेतला आहे.
बेळगावमधील साहित्य संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. पण कर्नाटक सरकारने कालच्या वादानंतर संजय राऊत यांना देखील बेळगावमध्ये येण्याला बंदी केली आहे. दरम्यान साहित्य संमेलनाला मला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बेळगावला जाणारच, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.
इतकंच नाही तर मी पाकिस्तानात नाही तर भारतात राहतोय, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर कर्नाटक पोलिसांनी बेळगावमध्ये चोख पोलीस बंदोबस्त वाढवला आहे, त्याच बरोबर अनेक ठिकाणी वाहानांची तपासणी देखील केली जात आहे.