जळगाव : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी कन्या आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी झी 24 तासला exclusive मुलाखत दिली. यावेळी सर्व काही अनपेक्षित घडल्यानेच, अचानक मिळालेल्या जबाबदारीबद्दल दडपण असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
निवडणूक लढवण्याची मनाची तयारी नव्हती, मात्र शेवटी पक्षाचा आदेश मानावा लागल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं. माहेरचं - सासरचे सर्व मागे उभे आहेत, त्यामुळेच निवडणुकीचा प्रचार करणं आता शक्य होत आहे असेही रोहिणी खडसे यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे यांना उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाकडून उमेदवारी घोषित झालेली नव्हती, तेव्हा ऐन वेळेस पक्षाने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. यानंतर एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवतील आपली कोणतीही हरकत नाही, त्यांना विजयी करा असं आवाहन केलं होतं. हे सर्व अनपेक्षित होतं.