धक्कादायक बातमी ! प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या 7 वर्षीय भावाचे अपहरण, नंतर त्यालाच संपवून टाकलं

 kidnapped 7 year old at pimpri chinchwad in pune : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या भावाची अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे.  

Updated: Sep 10, 2022, 12:57 PM IST
धक्कादायक बातमी ! प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या 7 वर्षीय भावाचे अपहरण, नंतर त्यालाच संपवून टाकलं title=

पिंपरी -चिंचवड : kidnapped 7 year old at pimpri chinchwad in pune : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या भावाची अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी आदित्य ओगले याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. गायब झालेल्या आदित्यचा काल रात्री उशिरा मृतदेह आढळला. त्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. (7-year-old boy kidnapped from Pimpri-Chinchwad found murdered)

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आदित्य याचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्याचे वडील गजानन ओगले यांच्याकडे 20 कोटीं रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, त्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचले. विशेष म्हणजे त्यांच्याच सोसायटीत राहणाऱ्या मंथन किरण भोसले आणि त्याचा साथीदार अनिकेत समुद्रे यांनी ही हत्या केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.  

पिंपरी चिंचवड शहरातील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दोन तरुणांनी आदित्यचे अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा वापर केला होता. मात्र क्लोरोफॉर्म अतिवापर केला गेल्याने आणि पीडित मुलाला पोत्यात बांधून ठेवल्याने त्यात श्वास कोंडून आदित्यचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

20 कोटी रुपयांची मागणी करत आदित्यचे अपहरण करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत असून आदित्यच्या अपहरण आणि हत्ये मागचे नेमके कारण काय होते याची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेन पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे. आदित्यच्या बेपत्ता होण्याची माहिती अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे आरोपी अधिक सावध झाले आणि पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी आदित्यची हत्या केली अशी देखील शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान,  या आरोपींनी हत्येबाबत दिलेल्या कबुलीनंतर सर्वांना धक्का बसला आहे.