Ranbir Kapoor Alia Bhatt : संपूर्ण जगानं नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं असतानाच सेलिब्रिटी मंडळींचाही उत्साह पाहण्याजोगा होता. बी टाऊनमध्येही अनेक सेलिब्रिटींनी नव्या वर्षाचं अनोख्या अंदाजात स्वागत केलं. यापैकीच काही सेलिब्रिटींचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले. रणबीर आणि आलियाचा व्हिडीओ. इथं ही सेलिब्रिटी जोडी, नकळतच त्यांच्या नात्याचं सुंदर रुप सर्वांसमोर आणताना दिसत आहे.
रणबीर आणि आलियानं यंदाच्या वर्षी त्यांची लेक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह नव्या वर्षाचं स्वागत केलं. रणबीरची आई, अभिनेत्री नीतू कपूरनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओमध्येच रणबीर- आलियाची रोमँटिक मुमेंटही पाहायला मिळाली.
नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये 31 डिसेंबर रोजी घड्याळात बाराचा ठोका पडताच एकच जल्लोष झाला आणि रणबीरनं क्षणाचाही विलंब न करता तडक आलियाच्या दिशेनं धाव मारत तिला घट्ट मिठी मारत नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
बी टाऊनची ही जोजी 28 डिसेंबर रोजी त्यांच्या लेकीसह जर्मनीला रवाना झाली होती. यंदाचं नवीन वर्ष आणि स्वागताच्या क्षणांचा हा अनुभव त्यांच्यासाठीही खास असणार यात शंकाच नाही. यावेळी त्यांच्यासमवेत आई नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धीमा साहनी तिचा पती भरत साहनी आणि मुलगी समायरा साहनीसुद्धा या क्षणी तिथं होते. आलियाची आई, सोनी राझदानही यावेळी कपूर कुटुंबासह नव्या वर्षाच्या स्वागतात सहभागी होताना दिसल्या.
नाताळसण अर्थात ख्रिसमसपासून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यात आलिया आणि रणबीरच्या घरी झालेली पार्टी असो किंवा मग संपूर्ण कपूर कुटुंबाचं एकत्रित सेलिब्रेशन असो या कुटुंबाची चर्चा सातत्यानं पाहायला मिळाली. त्यातही गाजली ती म्हणजे रणबीरची ही प्रेमाची मिठी....