सिंधुदुर्ग : आताची मोठी बातमी आहे. मालवणमधल्या तारकर्लीत (Tarkarli, Malvan) पर्यटक बोट बुडाली (Boat Accident) आहे. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू तर दोंघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटीत एकूण 20 पर्यटक होते. सुदैवाने 16 पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे. स्थानिकांनी बोट बुडाल्याचे दिसताच मदतकार्य सुरु केलं.. स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving in Tarkarli) करून परतत असताना हा अपघात झाला. सर्व पर्यटक पुणे आणि मुंबई इथले आहे.
नेमकी घटना काय?
मुंबई आणि पुणे इथले काही पर्यटक आज सकाळी स्कुबा डायव्हिंगसाठी मालवणमधल्या तारकर्ली इथे आले होते. दुपारी स्कुबा डायव्हिंग करुन बोटीने परतत असताना बोट बुडाली. यात नाकातोंडात पाणी गेल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला तर 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पण यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
बुडालेल्या बोटीचं नाव जय गजानन असल्याची माहिती समोर आली आहे. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकांनीही बचाकार्यात मोठी मदत केली. त्यामुळे 16 पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलं.
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक तारकर्ली इथं स्कुबा डायव्हिंगसाठी येतात.