कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देऊन टेम्पो ट्रॅव्हलर गाडी पंचगंगा नदीत कोसळुन 26 जानेवारीला मोठा अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला.
हा अपघात गाडीच्या ड्राव्हरच्या चुकीमुळं घडला असला तरी, या घटनेमुळं अर्धवट राहिलेल्या नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
इतकच नव्हे तर जुन्या शिवाजी पुलाचं आयुष्यमान संपल असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं 6 जून 2015 रोजी कळवलं आहे. तरी देखील या पुलावरुन आजही वाहतुक सुरु आहे.
दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ६ वर्षापुर्वी पर्यायी पूल केंद्राकडून मंजूर करून आणला, मात्र गेली 3 वर्षे हा पूल अर्धवट स्थितीत पडला आहे.
पुरातत्व विभागानं परवाणगी न दिल्यानंच या पुलाचं काम अर्धवट असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत आहेत. जर पुरातत्व विभागानं या पुलाच्या बांधकामाला मंजुरीच दिली नव्हती तर या पुलाचं 80 टक्के काम कसं पुर्ण करण्यात आलं हादेखील मोठा सवाल आहे.