कोल्हापूर : कोल्हापुरच्या जुना राजीवाडा पोलीस स्टेशनमध्ये अंबाबाई भक्त मंडळाचं ठिय्या आंदोलन सुरूय. महालक्ष्मीच्या देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट पसरलीय. त्याला कारण ठरलंय पुजकानं देवीला नेसवलेल्या घागरा चोळीमुळे. मात्र आता अंबाबाई भक्त मंडळ याप्रकरणी आक्रमक झालंय.
दरम्यान, शहर डी.वाय.एस.पी जुना राजीवाजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेयत. श्री पुजक अजित ठाणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. ठाणेकर यांनी घागरा भक्ताला परत देण्यासाठी 22 हजार रुपये घेतल्याचा आरोपही अंबाबाई भक्त मंडळानं केलाय.
शिवाय महालक्ष्मी देवीच्या डोक्यावरचं नाग चिन्ह श्री पुजकानं खरबडून काढलं आणि त्याचे तुकडे देवस्थान समितीमध्ये असल्याचा आरोपही मंडळानं केलाय. महालक्ष्मी देवीला एका भक्तानं दिलेला घागरा चोळीचा देवीला साज चढवण्यात आला..
ही गोष्ट कळताच भक्तांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.. देवीची पुजा ही नेहमी साडीमध्ये असते. मात्र एका भक्ताच्या आग्रहास्तव पुजकानं देविला दिलेला घागरा चोळी परिधान केला.. त्यामुळे पुजकाच्या या वागण्याविरोधात अंबाबाई भक्त मंडळ जाब विचारणार आहेत..