सांगलीतील पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली

पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची अखेर बदली करण्यात आली आहे. सांगलीत सध्या गाजत असलेलं अनिकेत कोथळे खून प्रकरण त्यांना भोवलंय. 

Updated: Nov 23, 2017, 09:36 PM IST
सांगलीतील पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली  title=

सांगली : पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची अखेर बदली करण्यात आली आहे. सांगलीत सध्या गाजत असलेलं अनिकेत कोथळे खून प्रकरण त्यांना भोवलंय. 

एकाची नागपूरला तर दुसऱ्याची सोलापूरला बदली

कोथळे खून प्रकरणानंतर या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी सांगली बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार आता अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला, तर उपअधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय. 

सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक शर्मा 

शिंदे यांच्या जागी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सुहेल शर्मा यांची नेमणूक करण्यात आलीय. दरम्यान, कामटे खून प्रकरणातील पाचही आरोपींची कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

कळंबा कारागृहाबाहेर मोठा बंदोबस्त

 बडतर्फ पीएसआय युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे आणि नसरुद्दीन मुल्ला यांच्यासह झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कळंबा कारागृहासमोर आणण्यात आलं. त्यानंतर सगळ्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी रवानगी कारागृहात करण्यात आली.