'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू

उर्वरित जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केवळ चार पट रक्कम देऊन केलं जाणार असल्यानं  शेतकऱ्यांनी विरोध केलाय. 

Updated: May 30, 2018, 11:41 PM IST

मुंबई : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी १० जिल्ह्यांत सक्तीचं भूसंपादन करण्यासाठी कायद्याने बुधवारपासून अधिसूचना लागू झालीय. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात ७० टक्के जमीन म्हणजेच साडे सातशे हेक्टर जमीन बाजारभावापेक्षा पाच पट रक्कम देऊन अधिग्रहित झाली आहे. पुढच्या एकवीस दिवसात शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. ॉ

उर्वरित जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केवळ चार पट रक्कम देऊन केलं जाणार असल्यानं  शेतकऱ्यांनी विरोध केलाय. त्यामुळे समृद्धीविरोधात पुन्हा नाशिक जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.