'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!

लातूरमधील शिरुर येथील शेतकऱ्याची हरभरा खरेदी न झाल्याने मुलीचे लग्न लांबणीवर पडलेय. मुलीच्या लग्नाची असवस्था कामय आहे.

'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!

लातूर : हरभरा खरेदीचा हमीभाव ठरलाय खरा.ऑनलाईन नोंदणी झाली. पण खरेदी सुरु न झाल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालयं. लातूरच्या शिरूर तालुक्यात हरभरा खरेदी न झाल्यानं एका शेतकऱ्याच्या मुलींचं लग्न लांबणीवर पडले आहे. सीमाचं लग्न लांबण्याचं कारण ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाच्या घरात २०० कट्टे हरभरा आहे. पण हमीभाव आणि बाजारभाव यात जवळपास १ हजार रुपयांचा फरक असल्यानं तिच्या बाबांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही. सरकारी अनास्थेमुळे सीमा आणि एकुरगे कुटुंबीय पुरते हतबल झालेत. 

सरकारी अनास्थेमुळे वाईट दिवस

सीमा एकूरगेचं लग्न २४ तारखेला ठरलं होतं. आता ते १२ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. पण त्यामुळे होणाऱ्या नालस्तीची तिच्या आई वडिलांना भीती आहे. सीमाचं लग्न लांबण्याचं कारण ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाच्या घरात २०० कट्टे हरभरा आहे. पण हमीभाव आणि बाजारभाव यात जवळपास १ हजार रुपयांचा फरक असल्यानं तिच्या बाबांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही. सरकारी अनास्थेमुळे सीमा आणि एकुरगे कुटुंबिय पुरते हतबल झालेत. आणि जिथे सनई चौघड्याचे सूर घुमायचे तिथे सध्या स्मशान शांतता आहे.

 ऑनलाईन खरेदीचे सोपस्कार तरीही...

भागवत एकूरगे लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात तळेगाव बोरीमध्ये राहातात. ५ हेक्टर शेतीपैकी ८ एकरावर त्यांनी यंदा हरभरा लावला. यंदा पाऊस पाणी चांगलं झालं. त्यामुळे २०० कट्टे हरभरा झाला. एकूरगेंनी मग ऑनलाईन खरेदीसाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण केले.पण खरेदी काही सुरू होईना. त्यामुळे दोन लाखचं नुकसान अंगावर घेण्यापेक्षा त्यांनी हरभरा शेतात आणि घरात साठवून ठेवलाय. आता दीड महिना उलटल्यावरही खरेदीला सुरूवात नसल्यानं त्यांनी जिल्हाधिका-यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खरेदी सुरू करण्याची मागणी केलीय. पण त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. 

छाती फाडून बघाल तर मुंडे दिसतील पण ...

भागवत एकूरगे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. छाती फाडून बघाल तर गोपीनाथ मुंडे दिसतील असं मोठ्या गर्वानं सांगतात...पण आपल्याच सरकारकडून होणाऱ्या सध्याच्या कारभारानं शेतकरी मरण कवटाळतोय असंही सांगायला ते विसरत नाहीत.

शेतकरी कुटुंब सरकारी हलगर्जीला बळी

 एकूरगेंचं घर एक लातूर जिल्ह्यात एकटं नाही. हरभरा साठवून खरेदी वाट बघणारी शेकडो कुंटुंब सध्या सरकारी हलगर्जीला बळी पडत आहेत. तूर खरेदी झालीय. पण त्याचा चुकारा नाही. त्यामुळे बळीराजा हतबल आहे. आता एकुरगेंची कहाणी ऐकून तरी फडणवीसाच्या सरकार हात पाय हलवणारा का हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.