कॉलेज इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये कॉपी पकडल्यावर उडी मारणाऱ्या सचिन वाघ याचा आज मृत्यू झालाय. 

Surendra Gangan Updated: Apr 11, 2018, 10:40 AM IST
कॉलेज इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू title=

औरंगाबाद : एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये कॉपी पकडल्यावर उडी मारणाऱ्या सचिन वाघ याचा आज मृत्यू झालाय. सचिननं काल त्याच्या कॉलेजच्या इमारतीतून चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला होता. 

त्याच्याजवळ कॉपी सापडली

१९ वर्षीय सचिन वाघची परीक्षा सुरु होती.अकाराच्या दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तपासणी सुरु केली. त्याच्याजवळ कॉपी सापडली. त्यातून सचिनला वर्गाबाहेर काढण्यात आल. प्राचार्यांकडे नेण्यात आले. त्यातून कारवाईची भीतीने घाबरलेल्या सचिनं चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

पालकांमध्येही चिंतेचं वातावरण 

सचिन वाघ परीक्षेला गेला होता. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्याचा हा आत्महत्येचा प्रयत्न कॅमेरात कैद झाला. या घटनेनंतर साऱ्या शहरभर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सचिन वाघची प्रकृती गंभीर होती. नेमकं हे प्रकरण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. शहरात या घटनेची जोरदार चर्चा आहे. तसेच पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.