जॉगिंग ट्रॅकच्या झाडीत बिबट्याचं दर्शन

औरंगाबादमध्ये भरवस्तीत बिबट्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली .

Updated: Dec 3, 2019, 10:22 AM IST
जॉगिंग ट्रॅकच्या झाडीत बिबट्याचं दर्शन

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भरवस्तीत बिबट्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली . एन वन परिसरातल्या काळ्या गणपती मंदिरामागे बिबट्या दिसून आला. इथल्या जॉगिंग ट्रॅकच्या झाडीत बिबट्याचं दर्शन झालं. वनविभाग आणि पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. मात्र ऐन वस्तीत बिबट्याच्या दर्शनानं नागरिकांमध्ये घबराट पसरलीय.

तर या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी वन विभागाची टीम आणि पोलीस देखील दाखल झाले. परंतु शहरी भाग असल्यामुळे हा बिबट्या आला कुठून हा प्रश्न उपस्थित हेत आहे. 

सकाळच्या सुमारास जॉगिंग करण्यासाठी आलेल्या काही लोकांना हा बिबट्या दिसला. शहरी भाग असला तरी थोड्या अंतरावर दाड झाडी असलेला भाग आहे. परंतु त्या भागात असे प्रणी असण्याची शक्यता नसून सुद्धा बिबट्या आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

सध्या एका घरा मागे बिबट्या असल्याचे सांगितले जात आहे. तर या बिबट्याला पाहाण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. बिबट्या मोकळा असल्यामुळे पोलीस नागरिकांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.