कोल्हापूर : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा या आणि अन्य मागणीसाठी कोल्हापूरात लिंगायत महामोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
या महामोर्चासाठी विविध संघटना आणि समाजानं पाठिंबा दर्शवला.न भुतो न भविष्यतो असा मोर्चा होईल असा विश्वास आयोजकांच्यावतीनं व्यक्त करण्यात आलाय.
कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं जाईल.