Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर 

Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी उद्या राज्यभरात साजरी होत आहे. आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आज आषाढी एकादशीला वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडतंय. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

17 Jul 2024, 05:17 वाजता

Mumbai Prati Pandharpur Wadala Live Updates : मुंबईच्या प्रतिपंढरपूर मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबईतील प्रतिपंढरपूर वडाला विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तांकडून भजन किर्तन करण्यात येत आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठोबा आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगळ्या ठेवलेल्या आहेत. परतून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. 4,000 चौरस मीटर मंदिर परिसरात गणपती आणि शिवाची मंदिरे देखील आहेत. आज आषाढीनिमित्त मंदिर परिसरात जत्रा भरते. 

17 Jul 2024, 05:09 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : शासकीय पूजा भक्तीभावाने संपन्न

आषाढ शुद्ध एकादशीला श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांची पत्नी लता  शिंदे आणि मानाचा वारकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे राहणार नाशिक जिल्ह्यातील अंबासन तालुका सटाणा या दोन्ही मान्यवर जोड्यांच्या हस्ते संपन्न झाली.

17 Jul 2024, 04:57 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पांडुरंग आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे, म्हणून...

 पांडुरंग आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे, हे सरकार देखील सर्वसामान्यांचंय आहे. यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही, एवढी खात्री मी आपल्याला देतो. मी रस्त्यानं येताना पाहतो एवढं प्रेम वारकरी बांधव-भगिनींचं मिळतंय, हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं. त्यामुळं मी आपला ऋणी आहे.

17 Jul 2024, 04:53 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : तिरूपती बालाजी धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

17 Jul 2024, 04:35 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : तिरुपती बालाजी धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तिरुपती बालाजी धर्तीवर पंढरपुरात टोकन पद्धतीने दर्शन व्यवस्था लवकरच सुरु करणार आहोत. त्यासाठी 3 कोटीचं मानधन देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

17 Jul 2024, 04:33 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : 'सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे', मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं

मुख्यमंत्र्यांनी पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल जयघोषाने भाषणाची सुरुवात केली. आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण तिसऱ्यांदा महापूजा मान मिळाला आहे. त्यासोबत आज चार पिढ्याने एकत्र पूजा केली. माझे वडीलही पूजेला उपस्थितीत होते. सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे, शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, असं साकडं विठुरायाचा चरणी घातलंय, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

17 Jul 2024, 04:22 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मानाचे वारकरी यांची सत्कार 

 मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी मंडळाकडून वर्षभरासाठी अहिरे दाम्पत्याला एसी मोफत प्रवास पास देण्यात आला. 

17 Jul 2024, 04:20 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. त्यासोबत मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील सौ. अशाबाई बाळू अहिरे  आणि बाळू शंकर अहिरे दाम्पत्य उपस्थितीत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

17 Jul 2024, 03:56 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांची पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याचा पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला. 

 

17 Jul 2024, 02:59 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठलाची महापूजा संपन्न 

विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली.