Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर 

Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी उद्या राज्यभरात साजरी होत आहे. आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आज आषाढी एकादशीला वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडतंय. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

16 Jul 2024, 21:15 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला घरच्या घरी पूजा कशी करायची?

आषाढी एकादशीला प्रत्येकाला मंदिरात जाऊन विठु माऊली आणि रुक्मिणीची पूजा करणे शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी माऊलीची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

सविस्तर माहिती वाचा - आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी

 

16 Jul 2024, 20:55 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीसाठी खास बंगळूरहून पोशाख

आषाढी एकादशी दिवशी लाडक्या विठुराया आणि रुक्मिणी मातेलाही खास पोशाख बेंगलोरमध्ये बनविण्यात आला आहे. विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली असून यावर संपूर्णपणे हाताने भरजरीत कलाकुसर करण्यात आलीय. देवाला बंगलोरी सिल्कचे अतिशय मुलायम असे सोवळे आणण्यात आले असून त्यावर भगव्या रंगाचीच मखमली शेला परिधान केला जाणार आहे. रुक्मिणीमातेलाही अतिशय उंची भरजरी सिल्कची नऊवारी साडी खास बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

16 Jul 2024, 20:51 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेबाबत मोठा निर्णय

दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा आहे. मात्र, यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हा मोठा निर्णय घेतला आहे.

16 Jul 2024, 20:44 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात पोहोचले आहेत. बेदाण्याचा हार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कृषी प्रदर्शनात सत्कार करण्यात आला. रामकृष्ण हरी म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केली. पंढपुरात येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बसला अपघातात जखमी झालेल्या 45 लोकांची विचारपूस केली. एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांनी जखमींची भेट घेतली. 

16 Jul 2024, 20:33 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

आषाढी यात्रेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अखिल भारतीय होलार समाजाने अडवला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली. आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी समाज आक्रमक झालाय. 

16 Jul 2024, 20:17 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरनगरी सजली

आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील दोन्ही शिखरे, संत नामदेव महाद्वार, संत ज्ञानेश्वर मंडप, संत तुकाराम भवन या ठिकाणी विद्युत रोषणाई केली आहे. 

 

16 Jul 2024, 20:12 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढपुरात सुंदर अशी तुळशी पंढरी नावाची प्रतिकृती 

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तुळशी पंढरी नावाची प्रतिकृती तयार केलेली आहे. यामध्ये एक उंच तुळशी वृंदावन तयार केलेला आहे. सोबत त्याच्या भोवताली लहान लहान असे तुळशी वृंदावणे तयार केले आहेत. सोबतच वारकरी आपल्या भजन कीर्तन साठी जी वापरतात ती वाद्य टाळ मृदुंग विना यांच्याही प्रतिकृती त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये अशा पद्धतीचा शिल्प तयार केला आहे.