Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर 

Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी उद्या राज्यभरात साजरी होत आहे. आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आज आषाढी एकादशीला वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडतंय. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

17 Jul 2024, 02:36 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहेत.

17 Jul 2024, 02:21 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : यंदा नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला विठुराच्या पूजेचा मान 

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पती ठरले आहेत. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील सौ. अशाबाई बाळू अहिरे वय 50 आणि श्री बाळू शंकर अहिरे वय 55 यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत.

17 Jul 2024, 01:14 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! 

आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आलेत. बुधवारचा दिवस पंचांगाच्या दृष्टीकोनातून शुभ योग, राहु काल, चंद्राची रास जाणून घ्या. 

Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

17 Jul 2024, 00:29 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशी खास शुभेच्छा 

विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या खास शुभेच्छा नक्कीच तुमच्या कामात येईल. 

आषाढी एकदाशी खास शुभेच्छा - Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीनिमित्त 'या' खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

 

16 Jul 2024, 23:26 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीसाठी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

आषाढी एकादशीसाठी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून यावर्षी दुप्पट लोक वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहोरात्र काळजी घेत आहेत. पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी 5 हजार एसटी बसची सोय करण्यात आली आहे. 

16 Jul 2024, 23:02 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : महापूजा सोहळा बुधवारी 17 जुलैला मध्यरात्री 2.00 सुरु होणार

एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मानाचे वारकरी आणि 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांसह मुख्यमंत्री महापूजा करणार आहेत. हा सोहळा बुधवारी 17 जुलैला मध्यरात्री 2.20 वाजता सुरु होणार आहे. 

16 Jul 2024, 22:58 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपूरनगरी भाविकांनी सजली

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी सजलीय. शहरातील मठ,धर्मशाळा या ठिकाणी भाविक मुक्कामी आहेत. तसंच रस्त्याकडेला राहुट्या, तंबू टाकून भाविक भजन, कीर्तन, हरिनामाचा जयघोष कानी पडत आहे. शहरातील लॉज ,भक्त निवास हे देखील हाऊसफुल्ल झाले आहेत. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.चंद्रभागा नदी, वाळवंट भाविकांची गर्दी दिसून येत आहे. नदीचे स्नान,भटक पुंडलिक मंदिराचे दर्शन घेवून भाविक दर्शन रांगेत उभा आहे.

 

16 Jul 2024, 22:57 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी …प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे…

एस टी, जादा रेल्वे तसंच खासगी वाहनातून भाविक मोठ्या संख्यने येत आहेत. त्याच बरोबरीने संतांच्या पालख्या सोबत देखील मोठ्या संख्येने भाविक आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीत जवळपास 12 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. 

 

16 Jul 2024, 22:54 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप

16 Jul 2024, 22:31 वाजता

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपूरच्या विठ्ठल - रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून खास पोशाख

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)