Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.   

Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण, या साऱ्यामध्ये राज्यात मोठ्या मुक्कामासाठी आलेला पाऊस मात्र माघार घेताना दिसत नसल्यामुळं काही भागांमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवताना दिसत आहे. 

 

5 Aug 2024, 09:14 वाजता

Breaking News Live Update : ठाकरे गटाच शिष्टमंडळ घेणार बेस्टचे व्यवस्थापक अनिल डीग्गीकर यांची भेट

ठाकरे गटाच शिष्टमंडळ घेणार बेस्टचे व्यवस्थापक अनिल डीग्गीकर यांची भेट. दुपारी 2.30 वाजता बेस्ट भवन कुलाबा येथे ठाकरे गटाच शिष्टमंडळ आणि बेस्टचे अधिकारी यांची होणार बैठक. बेस्ट उपक्रमानं लावलेल्या नवीन विद्युत स्मार्ट मीटर विरोधात निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाच शिष्टमंडळ भेट घेणार आहे. 

5 Aug 2024, 09:11 वाजता

Breaking News Live Update : पुजा खेडकरची युपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

युपीएससी ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती, तसंच त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. या विरोधात आता पूजा खेडकरची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

5 Aug 2024, 08:25 वाजता

Breaking News Live Update : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

जम्मू काश्मीर मधे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. आज (5 ऑगस्ट 2024) अनुच्छेद 370 रद्द केल्याला 5 वर्ष पूर्ण झाल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काश्मीरमधील चौका चौकात सुरक्षा दलाचे जवान तैनात. 

 

5 Aug 2024, 07:49 वाजता

Breaking News Live Update : गिरणा नदीपत्रात 12 ते 13 जण अडकले

गिरणा नदीपत्रात 12 ते 13 जण अडकलेत... काल संध्याकाळी 5 वाजेपासून मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीत पाण्यात 12 ते 13 जण अडकले. धुळ्याहून SDRF टीमला बोलवण्यात आलं असून अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरुय. बचावासाठी मालेगाव अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात येतेय. पाण्यात होड्या सोडून त्यातून तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तरुणांना गिरणा नदीच्या पाण्यात अडकून 12 तासापेक्षा जास्त वेळ झालाय. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्यानं तरुण अडकलेत. मासेमारीची हौस या तरुणांच्या जीवावर बेतलीय. 

5 Aug 2024, 07:44 वाजता

Breaking News Live Update : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

उजनी धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होण्याचे शक्यता आहे

5 Aug 2024, 07:34 वाजता

Breaking News Live Update : गोदावरी पाणबोटातील सर्व धरणे ओसंडून वाहू लागली

सलग 48 तास झालेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी पाणबोटातील सर्व धरणे ओसंडून वाहू लागलीये... गोदावरी नदीनं निफाड तालुक्यापासून रौद्ररूप धारण केलंय. नांदूर मधमेश्वर धरणातून 44 हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय...

5 Aug 2024, 06:58 वाजता

Breaking News Live Update : नाशिक जिल्ह्यात 24 तासांत मुसळधार पाऊस 

नाशिक जिल्ह्यात 24 तासांत मुसळधार पाऊस सुरूय. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय. त्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुय. नाशिकमध्ये सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन त्याकडे लक्ष ठेवून आहे. गंगापूर धरण समुहातून विसर्ग सुरू असल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळालाय. जवळपास 50 हजार क्युसेकनं विसर्ग मराठवाड्यासाठी सुरूय.

5 Aug 2024, 06:57 वाजता

Breaking News Live Update : आज पहिला श्रावणी सोमवार

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योर्तिंलिंग भीमाशंकरमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. पहाटेपासूनच बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदूमून गेलाय.