Breaking News Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी कसा असेल आजचा दिवस? विधानसभा निवडणुकीआधी बड्या पक्षांमध्ये नेमकी कोणती खलबतं सुरुयेत? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर   

Breaking News Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

Breaking News Live Updates : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात विरोधकांपासून इतरत्र त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा पाहायला मिळाली. राज्याच्या राजकारणासह समाजकारणातही अशा अनेक गोष्टी घडत असून, घडणार असून प्रत्येक लहानमोठ्या बातमीचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर...

31 Aug 2024, 10:37 वाजता

Breaking News Live Updates : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं 

केदारनाथ आणि गौचर दरम्यान भीमबलीजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. वास्तविक, केस्ट्रेल हेलिकॉप्टर खराब झाले होते. त्याची दुरुस्ती करावी लागली. त्यामुळे एमआय-17 हेलिकॉप्टरने लिफ्ट केले जात होते. त्यानंतर वायर तुटल्याने केस्ट्रेल हेलिकॉप्टर खाली पडले. या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एसडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याचा शोध घेतला.

 

31 Aug 2024, 09:40 वाजता

Breaking News Live Updates : रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांचं फोटोसेशन 

रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावर भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांनी यावेळी गळाभेट घेत एकत्र फोटोसेशनही केलं. राजकीय विरोधक विमानतळावर एकत्र आले आणि खांद्यावर हात ठेवत त्यांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा लक्ष वेधून गेल्या. मागील अनेक दिवसांपासून रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरू होते. रावसाहेब दानवे यांना लोकसभेत पाडल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला होता. तर, अब्दुल सत्तारांनाही पाडणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

31 Aug 2024, 08:53 वाजता

Breaking News Live Updates : अरबी समुद्रात तयार झाले 'असना' चक्रीवादळ

अरबी समुद्रात तयार झाले 'असना' चक्रीवादळ तयार झालं असून, भारतीय किनाऱ्याला त्यापासून कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं. गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र 'असना' चक्रीवादळात रूपांतरित झालं. 1976 नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात पहिल्यांदाच चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे, ज्याला पाकिस्तानने 'असना' असं नाव दिलं आहे.

31 Aug 2024, 08:35 वाजता

Breaking News Live Updates : राज्यातील भाजपची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच 

राज्यातील भाजपची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे संकेत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलंय.

31 Aug 2024, 08:19 वाजता

Breaking News Live Updates : पालघरच्या नेहरोळी इथे एकाच घरात कुजलेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह 

पालघरच्या नेहरोळी इथे एकाच घरात कुजलेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळलेत.  आईसह मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय.  मूळचे गुजरातचे असलेले 75 वर्षाचे मुकुंद राठोड,  62 वर्षाच्या कंचन  राठोड  तर 52 वर्षांची मुलगी संगीता राठोड अशी मृतांची नावं असून ते गेल्या तीस वर्षापासून पालघरमध्ये वास्तव्याला होतें .गेल्या बारा दिवसांपासून हे कुटुंब कोणाच्याही संपर्कात नसल्याने धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करतायत.

31 Aug 2024, 08:09 वाजता

Breaking News Live Updates : पुण्यात इसमानं बोलता लांबवले 14 लाखांचे दागिने 

मांजरी मध्ये राहणारे दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं 195 ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. दागिन्यांची पिशवी त्यांनी एक्टिवा गाडीच्या हुकला लटकवली होती. घरी परत जात असताना ते नातवंडांसाठी वडापाव घेण्यासाठी म्हणून हडपसर मधील रोहित वडेवाले समोर थांबले. दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले असताना त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. तेवढ्यात एक अनोळखी इसम तिथे आला. तुमचे पैसे मागे पडल्याचं सांगून त्यानं जयश्री यांचं लक्ष विचलित केलं आणि गाडीच्या हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन तो पसार झाला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाला आहे. धामणे यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या आणि इतर दागिने मिळून जवळजवळ 195 ग्रॅम सोनं चोरीला गेल आहे. आजच्या तारखेला त्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

31 Aug 2024, 07:57 वाजता

Breaking News Live Updates : हार्बर मार्गावर लोकल सेवा ठप्प

हार्बर मार्गावर लोकल सेवा ठप्प. मानखुर्द ते वाशी दरम्यान लोकल थांबल्यास. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून लोकल एकाच जागेवर .ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड झाल्याने वाशी कडे जाणारी वाहतूक ठप्प. वाशी स्थानकाजवळ  तांत्रिक बिघाड. 

31 Aug 2024, 07:55 वाजता

Breaking News Live Updates : मुंबईत आज ट्रॅफिक जॅम 

आज शहरात गणपती आगमन मिरवणुकांमुळे तसंच चिंतामणी आगमन मिरवणुकीमुळे लालबाग, परळ भागामध्ये शनिवारी आणि रविवारी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी लालबाग, परळ (डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे. तर बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन मुंबई वाहूतक पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

 

31 Aug 2024, 07:07 वाजता

Breaking News Live Updates : किल्ले राजकोट येथील दुर्घटनेसंदर्भात चौकशी समिती गठीत

किल्ले राजकोट येथील दुर्घटने संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. पुतळा दुर्घटना घडली यासंदर्भात नक्की कारणं काय याची चौकशी ही समिती करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही समिती गठीत करण्यात आली. 

31 Aug 2024, 07:06 वाजता

Breaking News Live Updates : माफी मागून प्रश्न सुटणार नाही... 

माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही... तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान नाना पटोलेंनी दिलंय. शिंदे पक्षाचे संजय शिरसाठ यांनी यावरुनच नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं. सत्तेतून बाहेर पडा ऐवजी जाहीर फाशी द्या असं म्हणा, असा टोला शिरसाठांनी पटोलेंना लगावला.