Ajit Pawar Angry: विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलाय. त्यामुळे राज्यभरात प्रचार सभांचा धुरळा उडालेला पहायला मिळतोय. राजकीय नेते भर सभेत एकमेकांवर टीका करताना, प्रत्युत्तर देताना दिसतायत. महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या भाषणाची चर्चा नेहमीच होत असते. कारण अजित पवारांच्या भाषणाची एक खास शैली आहे. ते मनात असेल ते बेधडक बोलतात. कोणाला सुनवायचे असेल तर स्पष्टपणे सुनावतात. शिरुरच्या सभेत अजित पवार संतापलेले दिसले.भावकीचा फायदा घेऊन बदनाम का करतोय? असे ते यावेळी म्हणाले. काय आहे हा नेमका प्रकार? जाणून घेऊया.
'भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे म्हणत मला बदनाम का करतोय? असा प्रश्न त्यांनी अशोक पवारांना विचारला. हाच बाबा चालू असल्याने चालू कारखाना मुलाच्या ताब्यात न देता बंद पडलेला कारखाना मुलाकडे दिला. कारखाना बंद पाडायचा होता तर तुझा व्यंकटेश कृपा बंद पाडला असता. पण तुझ्यावर कृपा दाखवली आणि मला आता बदनाम करतोयस, असे म्हणत त्यांनी अशोक पवार यांच्यावर टिका केली. यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावले
कुटुंब एकत्र आणण्यासाठी समोरून पावलं उचलली जात नाहीत, असं वक्तव्य अजित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केलंय. दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले तर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं. मात्र, समोरून प्रयत्न होत नाही, उलट ते वाढवण्याचं काम होतंय, असंही अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर एकत्र कुटुंबासंदर्भात विचार करू, सध्या तसा विचार केला नसल्याचं ते म्हणालेत. यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रीया दिली असून कुटुंबाची उणीदुणी काढण्यासाठी राजकारणात आले नाही असं त्या म्हणल्यात..
लोकसभेत पत्नी सुनेत्राला सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं. त्यामुळे त्यांनी आता विधानसभेला पुतण्याला माझ्या विरोधात उभं केलं. म्हणजे काट्याने काटा काढण्याचा हा प्रकार असू शकतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. यावर प्रतिक्रिया देतानाअजित पवार काहीही बोलू शकतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असे संकेत नाशिकच्या सभेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिले होते. यावरून राजकीय वातावरण तापलंय. देवेंद्र फडणवीसांसह सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रिया अजित झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये व्यक्त केलीय. महायुतीचं सरकार बनवायचंय. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचंय, असं विधान शाहांनी केलं होत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. कदाचित फडणवीसांची जागा धोक्यात आहेत. नाशिकच्या सभेतून फडणवीसांना विजयी करा, असं आवाहन अमित शाहांना करायचं असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय.